Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी विठ्ठल चोपडे जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी विठ्ठल चोपडे जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पाटीच्या चिटणीसपदी विठ्ठल चोपडे तर इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे यांची निवड करण्यात आली. तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादल विभागाच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले. सदर पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुत्रिफ, पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा. तसेच महानगरपालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा लागावा यासाठी सर्वच पक्षाचे नेतेमंडळी आपआपल्या पध्दतीने कामाला लागले आहेत. त्यामध्ये राज्यातील महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विठ्ठल चोपडे, सुहास जांभळे, बाळासाहेब देशमुख यांची कार्यकारीणीमध्ये वर्णी लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -