Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रपेट्रोल 8-10 रुपयांनी महागणार!! ट्रम्पमुळे भारत टेन्शनमध्ये

पेट्रोल 8-10 रुपयांनी महागणार!! ट्रम्पमुळे भारत टेन्शनमध्ये

जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत तेव्हापासून साऱ्या जगाला त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे टेन्शन देत आहेत. आता त्यांनी थेट रशियाला धमकी दिली आहे, परंतु त्याचा फटका भारताला बसणार आहे. रशियाने युक्रेन विरोधातील युद्ध ५० दिवसांत बंद केलं नाही तर अमेरिका रशियावर आणि रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅक्स लावेल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या या धमकीने भारताच्या कच्च्या तेलाच्या आयात धोरणावर मोठा परिणाम होणार आहे. एवढच नव्हे तर भारतात पेट्रोलच्या किमती ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

 

रशियाकडून जर भारताने कच्चे तेल घेणे बंद केले नाही तर अमेरिका १०० टक्के टॅरिफ लादणार असल्याची धमकी ट्रम्प (Donald Trump) यांनी दिली आहे. जर भारताने ही धमकी गांभिर्याने घेतली व रशियाकडून (Russia) तेल आयात करणे थांबविले तर आपल्यालाच मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कारण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे ३५-४०% रशियाकडून आयात करतो. जर ट्रम्प यांचा इशारा प्रत्यक्षात आला आणि रशियाकडून तेल खरेदी करण्यावरील आर्थिक दबाव वाढला, तर भारताला पर्यायी पुरवठा स्रोत शोधावे लागतील, जे स्वस्त नसतील. याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. (Fuel Price Hike Soon)

 

भारत रशियाकडून ३५-४० % तेल खरेदी करतो- Fuel Price Hike Soon

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अलिकडच्या एका कार्यक्रमात सांगितले की, रशिया हा सर्वात मोठा कच्चा तेल उत्पादक देशांपैकी एक आहे, ज्याचे उत्पादन दररोज ९ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त आहे.सध्या (India – Russia) भारत रशियाकडून ३५-४०% तेल खरेदी करतो. दुसरीकडे, जगाला ९७ दशलक्ष बॅरल कच्चे तेल लागते, त्याच्या जवळपास १० टक्के वाटा हा रशियाचा आहे. अशावेळी जर रशियाकडून पुरवठा विस्कळीत झाला तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठेत पुरवठ्याचे संतुलन बिघडेल, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढतील. कच्च्या तेल्याचा किंमती १३०-१४० डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशियाकडून २०२२ पर्यंत भारत फक्त २ टक्केच कच्चे तेल घेत होता, परंतू रशियावर निर्बंध आले आणि रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास सुरुवात केली. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताला मोठा फटका बसू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -