Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रकोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? पहिले नाव समोर; दिल्लीत मोठ्या घडामोडी!

कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? पहिले नाव समोर; दिल्लीत मोठ्या घडामोडी!

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनखड यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीत उपराष्ट्रपतीसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. असे असतानाच आता बिहार राज्यातीलच एका बड्या नेत्याची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे ते आता बिहारच्या या नेत्याचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये आले आहे.

 

मनाथ ठाकूर उपराष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार?

धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. सध्या या पदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. मात्र बुधवारी (23 जुलै) जे पी नड्डा यांनी राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची भेट घेतली आहे. रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. नड्डा आणि ठाकूर यांच्या भेटीचा हा प्रसंग फारच विशेष मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रामनाथ ठाकूर हे उपराष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.

 

रामनाथ ठाकूर मोदींच्या जवळचे नेते

कर्पुरी ठाकूर यांनी केलेल्या कामामुळे रामनाथ ठाकूर यांचे बिहार तसेच संपूर्ण देशात एक वेगळे वजन आहे. रामनाथ ठाकूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे नेते असल्याचे मानले जाते. गेल्याच वर्षी केंद्र सरकारने रामनाथ ठाकूर यांचे वडील कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

 

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी चालू

दरम्यान, जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाकडून नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. तशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले तसेच नियुक्त केलेले खासदार मदतान करू शकतील. आमची तयारी पूर्ण झाल्यावर लवकरात लवकरच उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -