Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रझटक्यात श्रीमंत, फटक्यात कंगाल! काय घडलं त्या गरीब मजुराच्या बाबत? अब्जावधी रुपये...

झटक्यात श्रीमंत, फटक्यात कंगाल! काय घडलं त्या गरीब मजुराच्या बाबत? अब्जावधी रुपये गेले कुठे?

देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. असाच एक प्रसंग राजस्थानमधून समोर आला. येथे टेनी मांझी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात अचानक अब्जावधी रुपये आले होते. ही रक्कम इतकी प्रचंड होती की तो ती नीट मोजूही शकला नाही. इतके पैसे पाहूनही त्याच्या मनात कोणताही गैर विचार आला नाही आणि त्याने याची माहिती बँकेला दिली. पण बँकेने अशी काही कृती केली की टेनीची प्रामाणिकता व्यर्थ गेली. नेमकं काय घडलं जाणून घ्या..

 

राजस्थानच्या सवाई माधोपुर येथे एका मजुराच्या खात्यात अचानक ‘कुबेराचा खजिना’ हस्तांतरित झाला. ही घटना केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. या घटनेनंतर मजूर टेनी मांझी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला, पण त्याच्या प्रामाणिकतेचे फळ म्हणून त्याचे बँक खाते सीज करण्यात आले. एवढेच नाही, तर बँकेने त्याच्या स्वतःच्या 600-700 रुपयांनाही हात लावला. आता परिस्थिती अशी आहे की, अब्जावधी रुपयांनी गजबजलेले त्याचे बँक खाते शून्यावर आले आहे. याबाबत त्याने मीडियामध्ये आपली खंतही व्यक्त केली आहे.

 

‘माझे 600-700 रुपयेही गेले’

 

सवाई माधोपुरच्या गंगापुर सिटी येथे एका बांधकाम सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीत काम करणाऱ्या बिहारच्या मजुर टेनी मांझीच्या खात्यात 7-8 दिवसांपूर्वी अचानक अब्जावधी रुपये हस्तांतरित झाले. या प्रकरणाची माहिती त्याने बँकेला दिली तेव्हा कोटक महिंद्रा बँकेने त्याचे खाते सीज केले. टेनी मांझीला सुरुवातीला वाटले की कदाचित ही रक्कम चुकून आली असेल आणि बँक ती परत घेईल. पण जेव्हा ही रक्कम परत गेली नाही, तेव्हा त्याने बँकेला याची माहिती दिली. मात्र, त्याची ही प्रामाणिकता आता त्यालाच भोवली. एका मीडियाच्या अहवालानुसार, बँकेने संपूर्ण रक्कम परत घेतली. एवढेच नाही, तर त्याच्या स्वतःच्या 600-700 रुपयांनाही बँकेने हात लावला. सध्या त्याच्या बँक खात्याचा शिल्लक शून्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -