Sunday, August 10, 2025
Homeब्रेकिंगभारतीय पोस्टचा मोठा निर्णय – 1 सप्टेंबरपासून 50 वर्षांची टपाल सेवा बंद

भारतीय पोस्टचा मोठा निर्णय – 1 सप्टेंबरपासून 50 वर्षांची टपाल सेवा बंद

टपाल खात्याची अत्यंत लोकप्रिय आणि खात्रीशीर टपाल सेवा येत्या 1 सप्टेंबरपासून अधिकृतपणे बंद होणार आहे. आता यापुढे आता महत्त्वाची कागदपत्रं आणि पार्सल पाठवण्यासाठी एकमेव पर्याय राहणार आहे. भारतीय पोस्ट खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. 1854 पासून मुंबईचं हृदय असलेली टपाल सेवा(Postal service) 1 सप्टेंबरपासून आता बंद होणार आहे. त्यामुळे पत्रं नाही फक्त नोटिफिकेशन राहणार आहे. आता यापुढे महत्त्वाची कागदपत्रं आणि पार्सल पाठवण्यासाठी आता एकमेव स्पीड पोस्ट सेवा राहणार आहे.

 

भारतीय पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा 50 वर्षांहून अधिक काळ असलेली सेवी आता भूतकाळात जाणार आहे. पोस्टानं आपलं काम फास्ट, ट्रॅक करण्यास सोपं आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे(Postal service). पोस्टानं सर्व सरकारी विभाग, न्यायालयं, विद्यापीठे आणि इतर संस्थांना 1 सप्टेंबरपूर्वी त्यांच्या सेवा स्पीड पोस्टला हस्तांतरित करावे असं सांगण्यात आलं आहे. ब्रिटिश काळापासून, म्हणजे सुमारे 171 वर्षांपासून ही सेवा सुरू होती.

 

आता ती सेवा जनसामान्याला निरोप देणार आहे. जेव्हा इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते तेव्हा ही पत्रं अनेकांच्या भावना व्यक्त करण्याचे साधन होते. पत्राबद्दल आजही अनेकांच्या भावना जोडल्या आहेत. आता पत्रं ही आठवणीत राहणार आहे.

टपाल सेवा बंद झाल्यानंतर, पोस्ट सेवा महाग होणार आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकरी, लहान व्यापारी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी पोस्टाच्या सेवेचा खर्च वाढणार आहे. जे स्वस्त टपाल सेवांवर अवलंबून आहेत.

 

स्पीड पोस्ट सेवेची किंमत 50 ग्रॅमपर्यंत 41 रुपयांपासून सुरू होते, तर रजिस्टर्ड पोस्ट 24.96 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त 20 ग्रॅमसाठी 5 रुपये मोजावे लागणार आहे. ज्यामुळे ती स्पीड पोस्टपेक्षा 20 ते 25% स्वस्त होते.यासंदर्भात पोस्टाकडून सांगण्यात आलं की, या सेवेच्या मागणीत घट पाहिला मिळत आहे. डिजिटल सेवा, ई-मेल, खासगी कुरिअर कंपन्या यांचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

 

 

 

यामुळे पारंपरिक टपाल सेवेचा वापर कमी झाल्याच चित्र आहे. 2011-12 मध्ये जवळपास 25 कोटी रजिस्टर्ड पोस्टाद्वारे पार्सल पाठवल्याची नोंद आहे. ती सध्या 2019-20 मध्ये 18 कोटींपर्यंत घसरली आहे. यामुळे पोस्टाने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याच पोस्टाकडून सांगण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -