Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रट्रम्प-पुतिन यांची 3 तास चाललेली बैठक अयशस्वी का ठरली? 5 पॉइंटमधून समजून...

ट्रम्प-पुतिन यांची 3 तास चाललेली बैठक अयशस्वी का ठरली? 5 पॉइंटमधून समजून घ्या Inside Story

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी 3 तास चर्चा केली. या बैठकीतून ठोस काही निघालं नाही. पण पुन्हा बैठक होऊ शकते, चर्चेचा मार्ग खुला ठेवलाय हीच काय ती सकारात्मक गोष्ट घडली. रशिया-युक्रेन युद्धात सीजफायर संबंधी कोणताही निर्णय झाला नाही. ही बैठक अपेक्षित परिणाम का साधू शकली नाही? अयशस्वी का ठरली? त्याची पाच कारणं समजून घ्या.

 

पुतिन यांचा पहिला उद्देश काय होता?

फेब्रुवारी 2022 मध्ये पुतिन यांनी युक्रेनमध्ये 2 लाख सैनिकांना पाठवण्याच आदेश दिलेला. काही दिवसात तिथलं सरकार पाडणं हा त्यांचा उद्देश होता. पुतिन यांना पुन्हा युक्रेनला रशियाच्या प्रभावाखाली आणायचं होतं. पण त्यात यश आलं नाही. 3 वर्षात रशियाने युक्रेनच्या 22 टक्के भागावर नियंत्रण मिळवलं. रशियन नेते दीर्घ काळापासून युक्रेनच्या अस्तित्वाच्या अधिकारावर प्रश्न निर्माण करत आहेत. त्यांचा दावा आहे की, 1917 साली साम्यवादी क्रांतीनंतर आधुनिक युक्रेनचा पाया रशियानेच रचला.

 

पुतिन यांनी युक्रेनी सैन्याला काय आवाहन केलेलं?

 

पुतिन 2021 मध्ये म्हणालेले की, रशियन आणि युक्रेनियन एकच आहेत. युक्रेनला ते कृत्रिम राज्य बोललेले. युद्ध सुरु झाल्यानंतर पुतिन म्हणाले की. युक्रेनी लोकांना शासनापासून सुरक्षेची आवश्यकता आहे. पुतिन यांनी युक्रेनी सैन्याला आव्हान केलं की, सत्ता आपल्या हातात घ्या. सरकार चालवणाऱ्या नशेडी टोळीला लक्ष्य करा असं सांगितलं. पुतिन यांना झेलेंस्की यांचं सरकार पाडायचं होतं.

 

पुतिन यांना या युद्धातून काय हवय?

 

पुतिन यांना युक्रेन विरुद्धच युद्ध आपल्या अटींवर रोखायचं आहे. भविष्यात युक्रेनपासून धोका नको म्हणून रशियाला युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावर नियंत्रण हवं आहदे. रशिया जिंकलेली एक इंच सुद्धा जमीन सोडायला तयार नाहीय. रशियाची मागणी आहे की, युक्रेनने नाटोपासून लांब रहावं. पाश्चिमात्य देशांनी लावलेले सर्व प्रतिबंध हटवावेत. जप्त केलेली रशियन संपत्ती परत करावी.

 

पुतिन-ट्रम्प काय म्हणाले?

 

पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंस केली. अलीकडच्या वर्षात अमेरिका-रशिया संबंध बिघडल्याच त्यांनी मान्य केलं. ट्रम्प आणि पुतिन म्हणाले की, त्यांना अमेरिका आणि रशियामध्ये सामान्य संबंध हवे आहेत. पुतिन यांनी पुढची बैठक मॉस्कोमध्ये आयोजित करण्याचा सल्ला दिला. रशियाचे आर्थिक दूत किरिल दिमित्रिव म्हणाले की, आम्ही पुढे सुद्धा अमेरिका-रशिया संबंध मजबूत बनवत राहू. भले, यासाठी कितीही विरोध होवो.

 

पुतिन बैठकीनंतर काय बोलले?

 

ट्रम्प यांना भेटल्यानंतर पुतिन म्हणाले की, आमची चर्चा रचनात्मक आणि सन्मानपूर्ण वातावरणात झाली. मी ट्रम्प यांचं एका शेजाऱ्याप्रमाणे स्वागत केलं. पुतिन म्हणाले की, युक्रेन संघर्ष मुख्य विषयांपैकी एक होता. रशियन जनतेने युक्रेनी नागरिकांना नेहमीच बंधु मानलं आहे. युद्धाची सर्व कारण संपवणं गरजेच आहे. युक्रेनची सुरक्षा निश्चित सुनिश्चित केली पाहिजे. आम्ही यावर काम करायला तयार आहोत. फॉक्स न्यूजने दावा केला की, ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक तणावपूर्ण वातावरणात झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -