Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रDJ लावल्याने शेजारी संतापला, डोक्यात घातला रॉड, मुलीच्या वाढदिवशीच बापाचा मृ्त्यू

DJ लावल्याने शेजारी संतापला, डोक्यात घातला रॉड, मुलीच्या वाढदिवशीच बापाचा मृ्त्यू

उत्तर प्रदेशातील मेरठ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची त्याच्या मुलीच्या वाढदिवसादिवशीच हत्या करण्यात आली आहे. अब्दुल (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो फेरीवाला असून व्यवसाय करून कुटुंब चालवत होता. मेरठमधील रेल्वे रोड पोलिस स्टेशन परिसरातील माछेरन भागात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपी अय्युब आणि इतर 5 जण फरार आहेत. शुक्रवारी रात्री 15 ऑगस्ट रोजी मृत व्यक्तीच्या मुलीचा 14 वा वाढदिवस होता. या खास दिनी अब्दुलने घरी पार्टी आयोजित केली होती. त्याने भाड्याने DJ लावला होता. रात्री 11 वाजता अब्दुल डीजेवर वाढदिवसाची गाणी वाजवत होता. त्यामुळे राडा झाला.

 

DJ मुळे झाला वाद

डीजेवर गाणी वाजत असताना अब्दुलच्या शेजारी राहणारा अय्युब (40) मित्रांसोबत पार्टी करत होता. त्यावेळी अय्युबने अब्दुलच्या घरी जाऊन त्याला आवाज कमी करण्यास सांगितले. मात्र यामुळे अब्दुल आणि अय्युबमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अय्युब आणि त्याचे मित्र काठ्या आणि रॉड घेऊन अब्दुलला मारायला आले आणि तुफान हाणामारी झाली.

 

या हाणामारीत अय्युबने अब्दुलच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला. त्यामुळे अब्दुलचे डोके फुटले आणि तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हाणामारीनंतर सर्व आरोपी एका घरात घुसले होते, मात्र अब्दुलच्या मृत्यूची माहिती मिळताच, सर्वजण पळून गेले.

 

आरोपीचा मित्र सापडला

सर्व आरोपी पळून जात असताना अय्युबचा एक मित्र जमावाच्या हाती लागला. त्याला जमावाने बेदम मारहाण केली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याची सुटका करत त्याला ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपी अय्युब आणि इतर आरोपी पसार झाले. आता याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -