Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींचा हप्ता कधी दुप्पट होणार? आता मुख्यमंत्र्यांनी थेटचं सांगितलं 

लाडक्या बहिणींचा हप्ता कधी दुप्पट होणार? आता मुख्यमंत्र्यांनी थेटचं सांगितलं 

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. रक्षाबंधनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी महिलांशी संवाद साधताना ही योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील अशी ग्वाही दिलेली, ज्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहेत.

 

Ladki Bahin Yojana Hafta

पुढील ५ वर्षे योजना सुरू राहणार

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत आल्याचे नमूद करत, सर्व ‘लाडक्या बहिणींचे’ आभार मानलेले. त्याचवेळी त्यांनी योजनेतील गैरप्रकार थांबवल्याचे स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना पुढील पाच वर्षेही कायम राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

पैसे रक्कम दुप्पट कधी होणार?

सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, हे मानधन ₹३००० करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे, अनेक महिलांना हा प्रश्न पडला होता की, ‘मानधनाची रक्कम दुप्पट कधी होणार?’

 

या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही निश्चित कालावधी दिला नाही. त्यांनी सांगितले की, योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवले जातील. त्यांच्या या विधानामुळे, योजनेचा हप्ता दुप्पट होण्याची अपेक्षा कायम असली तरी, त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल हे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -