आज सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी शेअर मार्केटची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरणात झाली आहे. आता सध्या असलेली निर्देशांकांची स्थिती बघितली तर बीएसई सेन्सेक्स सध्या तब्बल 1090 अंकांच्या वाढीसह 81690.36 वर ट्रेड करत आहे.तर निफ्टी 50 मध्ये देखील 359.35 अंकांची वाढ दिसून येत असून 24997.10 वर व्यवहार करत आहे.
त्यासोबतच निफ्टी बँकमध्ये देखील 740.20 अंकांची वाढ झाली आहे व सध्या 56075.90 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी आयटीमध्ये देखील 43.65 अंकांची घसरण झालेली आहे व सध्या 34785.40 वर व्यवहार करत आहे. या सकारात्मक सुरुवातीत टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत 13.85 अंकांची वाढ झाली असून सध्या हा शेअर 678.45 रुपयांवर व्यवहार करत आहे.
टाटा मोटर्सच्या शेअरची सध्याची स्थिती
आज मार्केटची सुरुवात झाली तेव्हा टाटा मोटर्सच्या शेअरची ओपनिंग प्राईस 677 रुपये होती. परंतु नंतर त्यामध्ये वाढ दिसून आली व सध्या हा शेअर 678.45 रुपयांवर ट्रेड करत आहे व ही किंमत कालच्या बंद किमतीच्या म्हणजेच 665 रुपयाच्या तुलनेत जास्त आहे. तसेच आज मार्केट सुरू झाले तेव्हा या शेअरची जास्तीत जास्त किंमत 681 रुपये तर कमीत कमी किंमत 673 रुपये इतकी होती व 52 आठवड्यातील कामगिरी बघितली तर जास्तीत जास्त किंमत 1142 रुपये आणि कमीत कमी किंमत 536 रुपये इतकी राहिली आहे
टाटा मोटर्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा
आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा बघितला तर एक वर्ष कालावधीकरिता केलेल्या गुंतवणुकीवर -38.13%, सहा महिने कालावधी करिता -1.03%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर -7.01% आणि एक महिन्याच्या गुंतवणुकीवर -0.32% इतका परतावा दिलेला आहे.