Sunday, August 24, 2025
Homeक्रीडाआशिया कपसाठी पाकिस्तान येणार नाही, 2026 वर्ल्डकप स्पर्धेवर होणार परिणाम!

आशिया कपसाठी पाकिस्तान येणार नाही, 2026 वर्ल्डकप स्पर्धेवर होणार परिणाम!

आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात ही स्पर्धा होते. भारतीय संघ क्रिकेट स्पर्धेसाठी 9 सप्टेंबरपासून युएई दौऱ्यावर जाणार आहे. दुसरीकडे, भारतात पुरुष हॉकी आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा बिहारच्या राजगीरमध्ये होणार असून 29 ऑगस्टपासून होणार आहे. ही स्पर्धा 29 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्याची तयारीही दर्शवली होती. पण पाकिस्तान हॉकी फेडरेशनने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास नकार दिला आहे. आता आशिया कप आयोजकांना पाकिस्तान येणार नसल्याने बांग्लादेश संघासोबत संपर्क साधला आहे.

 

2026 हॉकी वर्ल्डकप स्पर्धेची पात्रता

आशिया कप प्रतिष्ठित आशियाई पातळीवरील स्पर्धा नाही, तर 2026 च्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा देखील आहे. यामुळे या स्पर्धेचं महत्त्व आहे. त्यामुळे पाकिस्तानला यामुळे फटका बसू शकतो. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेत खेळला नाही तर त्यांना वर्ल्डकप स्पर्धेत संधी मिळणं कठीण होईल. दुसरीकडे, बांगलादेशला मोठी संधी मिळू शकते. हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं 16वं पर्व बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये आयोजन होणार आहे. ही स्पर्धा 14 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्याने होणार असल्याचं बोललं जात आहे

 

हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘भारत सरकारने आधीच स्पष्ट केलं होतं की पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यास तयार आहेत. पण ते भारतात येऊ इच्छित नसतील तर ती आमची समस्या नाही. जर पाकिस्तानी संघ आला नाही तर बांगलादेशला सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पण त्यांच्या होकारासाठी दोन दिवस वाट पाहावी लागेल. पुढच्या 48 तासात या स्पर्धेबाबतचं चित्र स्पष्ट होईल.’ भारताव्यतिरिक्त, चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान आणि चिनी तैपेई येथील संघ देखील या स्पर्धेत सहभागी होतील.

 

भारताचा हॉकी कप स्पर्धेचा इतिहास

भारताने हॉकी आशिया कप स्पर्धेचं जेतेपद शेवटचं 2017 मध्ये जिंकलं होतं. भारताने तेव्हा मलेशियाला अंतिम फेरीत 2-1 ने मात दिली आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. तेव्हापासून गेली 8 वर्षे भारताची जेतेपदाची झोळी रिती आहे. त्यामुळे यंदा जेतेपद मिळवण्यासाठी भारताची धडपड असणार आहे. भारताने 2003, 2007 आणि 2017 साली जेतेपदावर नाव कोरलं आहे. दक्षिण कोरियाने 1994, 1999, 009, 2013 आणि 2022 साली जेतेपद जिंकलं आहे. तर पाकिस्तानने तीन वेळा जेतेपदावर नाव कोलंलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -