आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर झाली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी मैदानावर उतरणावर आहेत.
भारताला अ गटात यजमान युएई, पाकिस्तान आणि ओमान यांचा सामना करावा लागणार आहे. १४ सप्टेंबरला India vs Pakistan यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे.
शूभमन गिल, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह या कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख खेळाडूंच्या समावेशावरून बरीच चर्चा रंगली. त्यावरन निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी बाजू मांडली. सूर्यकुमार दुखापतीतून सावरून पुन्हा मैदानावर परतणार आहे आणि पुढच्या वर्षीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे.
भारतीय संघ दुपारी १.३० वाजता जाहीर होणार होता, परंतु मुंबईतील मुसळधार पावसामुळे त्याला विलंब झाला आहे. बीसीसीआयचे सचिव आणि अन्य पदाधिकारी दुपारी २.३० वाजता मुंबईत पोहोचले आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.
कसं आहे सामन्याचं वेळापत्रक?
9 सप्टेंबर: अफगाणिस्तान वि. हाँगकाँग, अबू धाबी
10 सप्टेंबर: भारत वि. यूएई, दुबई
11 सप्टेंबर: बांगलादेश वि. हाँगकाँग, अबू धाबी
12 सप्टेंबर: पाकिस्तान वि. ओमान, दुबई
13 सप्टेंबर: बांगलादेश वि. श्रीलंका, अबू धाबी
14 सप्टेंबर: भारत वि. पाकिस्तान, दुबई
15 सप्टेंबर: यूएई वि. ओमान, अबू धाबी
15 सप्टेंबर: श्रीलंका वि. हाँगकाँग, दुबई
16 सप्टेंबर: बांगलादेश वि. अफगाणिस्तान, अबू धाबी
17 सप्टेंबर: पाकिस्तान वि. यूएई, दुबई
18 सप्टेंबर: श्रीलंका वि. अफगाणिस्तान, अबू धाबी
19 सप्टेंबर: भारत वि. ओमान, अबू धाबी
20 सप्टेंबर: B1 वि. B2, दुबई
21 सप्टेंबर: A1 वि. A2, दुबई
23 सप्टेंबर: A2 वि. B1, अबू धाबी
24 सप्टेंबर: A1 वि. B2, दुबई
25 सप्टेंबर: A2 वि. B2, दुबई
26 सप्टेंबर: A1 वि. B1, दुबई
28 सप्टेंबर: अंतिम सामना, दुबई
भारतीय संघ – सूर्यकुमार यादव, शुभमन गिल ( उप कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्थी. रिंकू सिंग