Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रअरे भावा, Whatsapp करायचं ना..; युजवेंद्र चहलला धनश्रीने सुनावलं, कोर्टात ढसाढसा रडली

अरे भावा, Whatsapp करायचं ना..; युजवेंद्र चहलला धनश्रीने सुनावलं, कोर्टात ढसाढसा रडली

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-डान्सर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिला. या दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान युजवेंद्रच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ‘बी युअर ओन शुगर डॅडी’ (स्वत:चेच शुगर डॅडी बना) अशा मजकूराचा टी-शर्ट त्याने परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये चहलने खुलासा केला होता की, हा जगाला आणि पूर्व पत्नीला संदेश देण्याचा एक मार्ग होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धनश्रीने त्यावर अखेर मौन सोडलं आहे.

 

ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत धनश्री तिच्या घटस्फोटाबद्दल आणि कोर्टातील त्या अखेरच्या सुनावणीबद्दल म्हणाली, “मला अजूनही आठवतंय की मी तिथे उभी होते आणि निकाल लागणार होता. मानसिकदृष्ट्या आमची तयारी होती, तरीही मी खूप भावूक झाली होती. मी तिथे सर्वांसमोर अक्षरश: रडत होती. त्यावेळी मला काय वाटत होतं, ते मी व्यक्तही करू शकत नव्हती. मला फक्त आठवतंय की मी रडत राहिले. मी रडतच होती.”

 

“सुनावणी पूर्ण झाल्यावर तो (चहल) आधी कोर्टातून बाहेर पडला. मी आतच होते आणि नंतर मागच्या दरवाजाने बाहेर पडले, कारण मला माध्यमांना सामोरं जायचं नव्हतं. मी कारमध्ये बसले आणि हुंदके आवरत होती. लोक तुमच्यावर टीका करतील, हे तुम्हाला माहीत असतं. हे सर्व समजण्याआधीच तो टी-शर्टचा स्टंट झाला. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहीत होती की त्यासाठी लोक मलाच दोष देतील. अरे भावा, व्हॉट्स अॅप करायचं होतं. टी-शर्ट घालायची काय गरज होती”, असा उपरोधिक सवाल तिने चहलला केला. “त्याक्षणी तिथे बसून मला जाणवलं होतं की, हे पूर्णपणे संपलंय, आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही”, अशा शब्दांत धनश्री व्यक्त झाली.

 

चहलसोबतच्या घटस्फोटाबाबत धनश्री पुढे म्हणाली, “या सर्व गोष्टींसाठी मी का रडत होती? मग मी विचार केला की, जाऊ दे, संपवूया हे सगळं. त्या टी-शर्टच्या स्टंटने आणि त्या क्षणांनी मला हसण्याची आणि तिथून पुढे जाण्याची प्रेरणा दिली. सगळंच संपलं होतं.”

 

कोविड महामारीदरम्यान चहल धनश्रीकडून डान्सचे धडे घेत होता. तेव्हाच त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. जून 2022 पासून दोघं वेगवेगळे राहत होते. नंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असता मार्चमध्ये ते अधिकृतरित्या विभक्त झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -