Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रदेवाला तब्बल १४० कोंटीचे सोने दान करणार हा भक्त, स्वत: सीएमनी केली...

देवाला तब्बल १४० कोंटीचे सोने दान करणार हा भक्त, स्वत: सीएमनी केली घोषणा

तिरुपती बालाजीचे भक्तांचे दान नेहमीच चर्चेत असते. आता भगवान वेंकटेश्वर स्वामी एका भक्ताने त्याला व्यवसायात आलेल्या यशा म्हणून आनंदी होत बालाजीला १४० कोटी रुपयांचे १२१ किलो दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात स्वत: माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगलागिरीत गरीबी निर्मूलन कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.

 

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की या भक्ताने एक कंपनी सुरु करण्याचे स्वप्न पाहीले होते. त्यांनी सांगितले की भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांच्या कृपेने त्यांच्या कंपनीच स्थापन झाली नाही तर तिला मोठे यश मिळाले. नायडू पुढे म्हणाले आता या भक्ताला वाटतेय की या यशाचे श्रेय भगवान बालाजीला दिले पाहीजे. त्यासाठी १२१ किलोचे सोने व्यंकटेश्वर स्वामींना अर्पित करणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की या भक्ताने त्याची कंपनीचे ६० टक्के शेअर विकून १.५ अब्ज अमेरिकन डॉलर कमावले आहेत.

 

१२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते मूर्ती?

नायडू यांनी सांगितले की त्याच्या संपत्तीचा हा एक हिस्सा हा भक्त देवाला दान करु इच्छीत आहे. कारण त्याला असे वाटते की ही सर्व भगवान व्यंकटेश्वराच्या कृपेने झालेले आहे. नायडू यांनी हे देखील सांगितले की भगवान व्यंकटेश्वर स्वामीच्या मूर्तीला दर दिवशी १२० किलोच्या सोन्यांच्या दागिन्यांनी सजवले जाते. ही बाब जेव्हा त्या भक्ताला समजली तेव्हा या भक्ताने १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला. या भक्ताने त्याची ओळख गुप्त रहावी अशी विनंती केलेली आहे.

तिरुपती दरवर्षी लाखो भक्त घेतात दर्शन

भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे आहे. आणि हे मंदिर जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार व्यंकटेश्वरांना समर्पित आहे. दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनाला येत असतात. हे मंदिर त्याची भव्यता, आध्यात्मिक महत्व आणि दानातून येणाऱ्या मिळणाऱ्या प्रचंड धन संपत्तीसाठी ओळखले जाते. या मंदिरात भक्तदरवर्षी अब्जावधी रुपये आणि सोने चांदी आणि कॅश दान करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -