Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रकारने LPG टँकरला धडक देताच उडाला आगीचा भडका, ५० पेक्षा जास्त जण...

कारने LPG टँकरला धडक देताच उडाला आगीचा भडका, ५० पेक्षा जास्त जण होरपळले

कारची एलपीजी टँकरला धडक बसल्यानं भीषण स्फोट झाला. यात किमान दोघांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण होरपळले आहेत. पंजाबच्या होशियारपूर-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

 

शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मदियाला अड्डा परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी टँकरला कारची धडक बसली. यानंतर टँकरमधून गॅस लीक झाला आणि आगीचा भडका उडाला. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपासच्या १५ पेक्षा जास्त दुकानं, ४-५ घरांना ही आग लागली. यात अनेक जण अडकले होते. लोक झोपले असताना घडलेल्या या घटनेमुळं मोठी हानी झाली आहे.

 

मदियाला गावात आग लागल्याच्या घटनेनंतर पंबाजचे मंत्री रवज्योत सिंग घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी म्हटलं की, घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे. यात किती जण बेपत्ता आहेत सध्या सांगता येणार नाही. एका कारने धडक दिल्यानं टँकरचा स्फोट झाला असं प्रत्यक्षदर्शी सांगतायत.

 

वेगवान वाऱ्यांमुळे टँकरमधून लीक झालेला गॅस पसरला आणि आगीचा भडका उडाला. स्फोटानंतर गावकरी जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. जखमींना होशियारपूरमधील रुग्णालयात दाखल केलं आहे. यापैकी दोघांना मृत घोषित केलंय. तर ५-७ जण गंभीररित्या होरपळले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी दुसरीकडे हलवण्यात आलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -