टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.
गिलला आशिया कप 2025 साठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, परंतु त्याआधी त्याला मोठा धक्का बसला आहे.
28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मोठ्या स्पर्धेत खेळणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे, तर तो या स्पर्धेत एका संघाचे नेतृत्व करत होता.
वृत्तानुसार, गिल सध्या आजारी आहे आणि चंदीगड येथील त्याच्या घरी विश्रांती घेत आहे.
बीसीसीआयला गिलच्या आरोग्याबाबतचा अहवाल नुकताच पाठवण्यात आला आहे.नॉर्थ झोनच्या निवड समितीने गिलच्या अनुपस्थितीची शक्यता आधीच गृहित धरली होती.
गिलच्या अनुपस्थितीत शुभम रोहिल्ला संघात सामील झाला आहे.
तर अंकित कुमारला उपकर्णधारावरून थेट कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.