दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. गोकुळने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये गोकुळने प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ केली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
गाय आणि म्हैस यांच्या दुधाचे सध्याचे दर काय?
गोकुळ दूध संघाने गणेशोत्सवाच्या काळातच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलीटर 1 रुपयाने गोकुळने वाढ केली आहे. म्हैस दूध खरेदी दर प्रतिलीटर 50 रुपये 50 पैसे वरुन 51 रुपये 50 पैसे असा केला आहे. तर गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर 32 रुपयांवरून 33 रुपये केला आहे. गोकुळ दूध संघाने केलेल्या खरेदी दराच्या वाढीमुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.