Tuesday, September 16, 2025
Homeब्रेकिंगसंकटांचा कहर! 30 ते 31 ऑगस्ट धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा

संकटांचा कहर! 30 ते 31 ऑगस्ट धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. पावसाने थैमान घातले आहे. काही भागात अतिवृष्टी झालीये. मराठवाड्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतांचे मोठे नुकसान झाले असून पिक वाहून गेली आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्हात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. काही गावांचा संपर्क देखील काल तुटला. सततच्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. कोकण, मराठवाडा, मुंबई आणि विदर्भात आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय. देशात पावसाचा हाहाकार सुरू आहे. आज काही भागात ऑरेंज अलर्ट जार करण्यात आलाय. 30 ते 31 ऑगस्टदरम्यान देशभरात अतिमुळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी काही प्रमाणात पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले. कालही पाऊस होता. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पुण्यामध्ये आजही पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भातही पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळत आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 13 पैकी 9 दरवाजे उघडले. वर्धा नदीत सोडला पाण्याचा विसर्ग.

 

यवतमाळ, अमरावती, वर्धा,चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकाना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. सध्या अप्पर वर्धा धरणात 92 टक्के इतका जलसाठा आहे. सततच्या पावसामुळे हे मोठं धरण भरले आहे. चाळीसगावात मुसळधार पावसानंतर गिरणा धरण 90 टक्क्यांवर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले. चाळीसगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्ध्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण 90 टक्के भरले. मन्याड, वलठाण, कोदगाव, हातगाव असे एकूण सात प्रकल्प शंभर टक्के भरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -