Sunday, September 7, 2025
Homeमहाराष्ट्रझटपट होणार आधार कार्डची सगळी कामं...लवकरच लॉन्च होतय ई-आधार अ‍ॅप...काय असतील फिचर्स?

झटपट होणार आधार कार्डची सगळी कामं…लवकरच लॉन्च होतय ई-आधार अ‍ॅप…काय असतील फिचर्स?

आधार कार्डशी संबंधित सगळी कामं जलद गतीने पूर्ण करण्यासाठी लवकरच एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच होणार आहे. ‘ई-आधार’ असे या अ‍ॅपचं नाव आहे.

 

या वर्षाच्या अखेरीस हे अ‍ॅप सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता आधार संबंधित सगळी कामं होणार एका झटक्यात पूर्ण होणार आहेत.

 

या अ‍ॅपमुळे नागरिकांना आधार कार्ड अपडेट्ससाठी केंद्रांवर फेऱ्या मारण्याची गरज नसून सर्व कामे स्मार्टफोनवरून अगदी काही मिनिटांत पूर्ण होणार आहेत. ई-आधार या अ‍ॅपद्वारे वापरकर्ते त्यांचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर यासारखी माहिती ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकणार आहेत.

 

या अ‍ॅपद्वारे वापरकर्त्यांना आधार कार्डची सॉफ्ट कॉपीदेखील लगेच डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे अनेकांना आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही. सध्या ही माहिती अपडेट करण्यासाठी नागरिकांना आधार केंद्रांवर फेऱ्या मारव्या लागत आहेत. पण नव्या अ‍ॅपमुळे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होणार आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे बायोमेट्रिक अपडेट्स मात्र नोव्हेंबर 2025 पासून आधार केंद्रांवर जावे लागेल, अशी माहिती आहे. यासोबतच या अ‍ॅपमध्ये जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मनरेगा रेकॉर्ड, वीज बिल ही सर्व माहिती युजर्सच्या अ‍ॅपमध्ये आपोआप दिसणार आहेत. या अ‍ॅपमध्ये एआय आणि फेस आयडी या टेक्नोलॉजीचा समावेश असणार आहे.

 

ई आधार हे अ‍ॅप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि UIDAI यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे अ‍ॅप तयार केलं जाणार असून लाखो नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -