अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात भारताकडून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान आणि त्यानंतर चीनच्या दाैऱ्यावर गेले. चीनमध्ये ते पुतिन यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करताना देखील दिसले. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील मागील काही वर्षांचे चांगलेच संबंध बिघडले आहेत. मात्र, काल दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून ते भारताबद्दलच्या मैत्रीबद्दल बोलताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला मोठी धमकी दिलीये.
टॅरिफच्या मुद्द्यावरून संबंध बिघडलेले असतानाच आता भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्याचे संबंध अजूनही मजबूत आहेत, हे दिसत आहे. दोन्ही देशांनी सोमवारी अलास्कामध्ये युद्ध अभ्यास सुरू केला आहे. हा सराव अलास्कातील फोर्ट वेनराईट येथे होतोय. मद्रास रेजिमेंटचे 450 हून अधिक भारतीय सैनिक 14 सप्टेंबरपर्यंत अमेरिकन सैन्याच्या 11 व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या आर्क्टिक वुल्व्हज ब्रिगेड कॉम्बॅट टीमच्या 5 व्या इन्फंट्री रेजिमेंट बॉबकॅट्ससोबत युद्धाभ्यास करतील.
टॅरिफच्या मुद्द्यानंतर आता भारताचे तब्बल 450 हून अधिक सैनिक हे थेट अलास्कामध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस चीनच्या दाैऱ्यावर होते. भारत आणि अमेरिकेच्या सैन्यामध्ये युद्धाअभ्यास सुरू असल्याची माहिती भारतीय विदेश मंत्रालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिलीये. हेच नाही तर भारतीय सैन्य अलास्कामध्ये पोहोचल्यानंतरचा एक फोटोही शेअर करण्यात आल आहे
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताविरोधात भडकावू विधाने अमेरिकेकडून केली जात आहेत. त्यामध्येच आता मैत्रीच्या दिशेने पाऊल टाकताना अमेरिका परत दिसत आहे. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारतातील अनेक उद्योगांवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. सी फूडचे मोठे नुकसान होताना दिसतंय. यासोबत भारत आणि अमेरिकेतील पोस्ट सेवा देखील वाढलेल्या करामुळे बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. आका आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून कोणतीही कागदपत्रे वगैरे अमेरिकेत पाठवता येणार नाहीत.