Saturday, September 6, 2025
Homeब्रेकिंगनवरात्रीच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी सुरू होणार नवीन बससेवा

नवरात्रीच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी सुरू होणार नवीन बससेवा

यावर्षी नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. या दिवसांत अनेक भाविक महाराष्ट्रातील साडेतील शक्तीपिठांचे दर्शन घेत असतात. आणि देवीकडे साकडं मागत असतात. तुम्हीही यंदा साडेतीन शक्तिपीठांना भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. कारण नवरात्रीच्या काळात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी नवीन बससेवा सुरु होणार आहे. हि बस सेवा पुण्यातून सुरु होणार असल्याने पुणेकरांना याचा विशेष लाभ मिळणार आहे.

 

कधी आणि कुठून होणार नवरात्री बस सेवा –

कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी व वणीची सप्तशृंगी देवी अशा साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घडवून आणणारी बससेवा 27 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड आगारातून सुटणार आहे. हि बस पहिल्या दिवशी कोल्हापूरला जाईल. त्याठिकाणी तुम्ही अंबाबाईचे दर्शन घेऊ शकता. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर तेथून ही बस तुळजापूरला जाईल.. तुळजापुरात तुम्हाला तुळजाभवानीचे आशीर्वाद घेता येथील. तुळजापूरातच तुमचा मुक्काम असेल.

 

पुढे दुसऱ्या दिवशी ही गाडी माहूरला जाणार आहे. त्याठिकाणी रेणुका मातेचे दर्शन झाल्यानंतर माहूरलाच या बसचा मुक्काम राहणार आहे. तिसऱ्या दिवशी ही विशेष बस नाशिक जिल्ह्यातील वणी येथे जाणार आहे. वणी येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि आणि मग बसचा परतीचा प्रवास सुरू होईल. पुन्हा हि बस पिंपरी चिंचवड आगारात येईल.

 

पिंपरी चिंचवड आगाराच्या स्थानक प्रमुख वैशाली कांबळे यांनी हि माहिती दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाविकांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुम्ही या गाडीने नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील तीनही शक्तीपीठांना भेटी देऊन दर्शन घेऊ शकता. आणि देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -