एका १६ वर्षीय किशोरवयीन मुलीवर तिच्या मालकिणीच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. ही पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
जेव्हा याप्रकरणाचा जाब विचारला, तेव्हा आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनेनंतर नौचंडी पोलिसांनी टीपी नगर अंसल कॉलनीतील एका डॉक्टरसह तिघांच्या विरोधात जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक देखील केली.
घरची स्थिती हालाखीची असल्याने पीडित १६ वर्षीय तरुणी ही घरकामासाठी जात असे. याचा फायदा घरमालकीण आणि तिच्या मुलाने घेतल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर, तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा भयंकर प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीच्या कुटुंबाने केली आहे.




