पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत 21 वा हप्ता उत्तर भारतातील 4 राज्यांना देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंडानंतर आता जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ तातडीने देण्यात आला आहे. मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 171 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील जवळपास 8.55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्राने 2000 रुपयांप्रमाणे रक्कम जमा केली आहे. यामध्ये 85,418 महिला शेतकरी आहेत. पण महाराष्ट्रात अतिवृष्टी,महापूराने थैमान घातलेले असतानाही राज्यातील शेतकरी मात्र या मदती निधीच्या प्रतिक्षेत आहेत.
केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेस आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांसाठी 21 वा हप्ता जमा केला. या राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील अनेक भागांना मोठा फटका बसला. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. आता इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या 2,000 रुपयांच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.
दिवाळी 2025 पूर्वी इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. अर्थात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल. शेतकऱ्याची पात्रता, e-kyc आणि आधार बँक लिंकिंग या आधारे ही प्रक्रिया पूर्ण होईल. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्म केलेली नाही. त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तर काहींना दिवाळीनंतर ही रक्कम प्राप्त होण्याची शक्यता आहे.
तुमचे नाव यादीत आहे का?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता पात्र शेतकर्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.
अडचण असल्यास तक्रार करा
ई-केवायसी पूर्ण झाले असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा.




