Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रवैयक्तिक टोमणे मारण्यासाठी सलमानकडून ‘बिग बॉस 19’चा वापर? या लोकांवर काढला राग

वैयक्तिक टोमणे मारण्यासाठी सलमानकडून ‘बिग बॉस 19’चा वापर? या लोकांवर काढला राग

‘बिग बॉस 19’ सुरू झाल्यापासून सूत्रसंचालक सलमान खान विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. ‘वीकेंड का वार’ या एपिसोडची प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता असते. कारण या एपिसोडमध्ये सलमान स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतो तर काहींनी महत्त्वाचे सल्ले देतो. सलमानचा हा खास एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून सलमान ‘वीकेंड का वार’मध्ये त्याच्या वैयक्तिक वादांबद्दल अधिक टिप्पणी करताना दिसत आहे. ‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यप, गायक अरिजीत सिंह यांच्यानंतर आता ‘सिकंदर’चा दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांच्यासोबतच्या वादावर त्याने बिग बॉसच्या सेटवरून उत्तर दिलं आहे.

 

‘दबंग’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमानवर गंभीर आरोप केले होते. “सलमान गुंड आहे, त्याने लोकांचे करिअर बुडवले”, असं तो म्हणाला होता. त्यावर सलमानने एका ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये मौन सोडलं होतं. “करिअर बनवणारा तर वर (देव) आहे. मी अनेकांचं करिअर बुडवलं, असं लांछन मला लावलं गेलंय. खासकरून बुडवणारे तर माझ्या हातातच नाहीत. परंतु आजकाल सर्वकाही चालतं ना, की करिअर खाऊन जाईल. कोणाचं करिअर खाल्लं मी? जर खायचंच असेल तर मी माझं स्वत:चंच करिअर खाऊन टाकेन,” असं तो म्हणाला होता.

 

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये त्याने गायक अरिजीत सिंहसोबतच्या वादावर प्रतिक्रिय दिली. 2014 पासून या दोघांमध्ये वाद सुरु होते. “अरिजीत आणि मी आता चांगले मित्र आहोत. आमच्यात थोडा गैरसमज झाला होता आणि तो गैरसमज माझ्याकडूनच झाला होता”, अशी जाहीर कबुली सलमानने दिली.

 

याच एपिसोडमध्ये सलमानने ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केलेल्या टीकांवर प्रत्युत्तर दिलं. दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोसने सलमानवर सेटवर उशिरा आल्याचा आरोप केला होता. त्याच्यामुळेच चित्रपट फ्लॉप झाल्याचं त्याने म्हटलं होतं. “सिकंदर फ्लॉप झाला, असं लोक म्हणतात. पण मी तसं मानत नाही. त्याची कथा चांगली होती. पण मी सेटवर रात्री 9 वाजता पोहोचायचो. त्यामुळे गडबड झाली. आमच्या दिग्दर्शकांनी असं म्हटलं होतं. पण मला दुखापत झाली होती. परंतु त्यांचा एक चित्रपट (मधारासी) नुकताच प्रदर्शित झाला. त्याचा अभिनेता पहाटे 6 वाजताच सेटवर यायचा. हा चित्रपट खूप मोठा आहे आणि तितकाच मोठा.. (हसतो). सिकंदरपेक्षाही ब्लॉकबस्टर”, असा उपरोधिक टोला सलमानने लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -