Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीकागलमध्ये बंद फ्लॅट फोडून 25 लाखांचे दागिने लंपास

कागलमध्ये बंद फ्लॅट फोडून 25 लाखांचे दागिने लंपास

येथील बालाजी हाईटस् इमारतीतील दोन फ्लॅटच्या बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने बेडरूमच्या तिजोरीतील 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी भर दिवसा घडलेल्या घटनेची नोंद रात्री उशिरा कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.

 

तिसर्‍या मजल्यावरील रावसाहेब भास्कर देशमुख यांच्या 303 क्रमांकाच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून 148 ग्रॅम वजनाचे गंठण, नेकलेस, राणीहार, मंगळसूत्र, पदक असलेले साहित्य, टॉप्स असे एकूण 11 लाख 84 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. संतोष अरुण कोगनोळीकर यांच्या 203 क्रमांकाच्या फ्लॅटचाही कडी-कोयंडा तोडून चोरट्याने 169 ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने 13 लाख 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

 

करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे अधिक तपास करीत आहेत. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाहेरगावी गेलेल्या नागरिकांचे बंद घर आणि फ्लॅट शोधून चोरटे दागिन्यांवर डल्ला मारत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -