Wednesday, November 12, 2025
Homeब्रेकिंगविद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघात

विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघात

भीषण अपघाताची घटना समोर आली आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळी, या बसमध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा -मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात हा अपघात झाला आहे, बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बस दीडशे फूट खोल दरीमध्ये कोसळल्यानं पूर्णपणे डॅमेज झाली आहे. या अपघातामध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, या अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे. अक्कलकुवा- मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात हा अपघात झाला आहे. बसमध्ये दबल्याने एका विद्यार्थ्याचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात झाली असून, अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं

 

दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. मोलगी गावाहून अक्कलकुवाच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना आमलिबारी परिसरात हा अपघात झाला आहे.

 

हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मेहुनबारे आश्रम शाळेच्या दोन बस आज दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या, त्यातील एका बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -