Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: मुलीचे लग्न लावून देण्यास नकार; एकावर कटरने वार

इचलकरंजी: मुलीचे लग्न लावून देण्यास नकार; एकावर कटरने वार

मुलीचे लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून कटरने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना तारदाळ येथे घडली. यामध्ये सोहेल शफिक शिरोळे (रा. समर्थनगर) हा जखमी झाला. याप्रकरणी तिघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 

यापैकी साहील रशीद सय्यद (वय 20), साजीद रशिद सय्यद (22, दोघे रा. समर्थनगर, तारदाळ) यांना पोलिसांनी अटक केली. संशयितांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरमान मोमीन (24, रा. खोतवाडी) हा घटनेनंतर पसार झाला आहे. याबाबत शब्बीर डोंगरीसाब शेख (39, रा. समर्थनगर, तारदाळ) यांनी फिर्याद दिली आहे. यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतीच्या गेटसमोर शब्बीर आले होते. या ठिकाणी संशयितही जमले होते. शब्बीर यांनी आपल्या मुलींच्या सांगण्यावरून संशयितांसोबत लग्न लावून देण्यास नकार दिला.

 

या रागातून संशयतांनी शब्बीर यांना तसेच भाऊ शाबीर शेख व सोहेल शिरोळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. साहील हा शब्बीर यांच्यावर कटर घेऊन धावून गेला. यावेळी सोहेल शिरोळे मध्ये आल्यामुळे त्याच्या उजव्या दंडावर कटरने वार करून गंभीर जखमी करून संशयितांनी पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -