Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रनवं घर झालं, मुहूर्त ठरला, सुरज चव्हाणच्या घरी सनई चौघडे वाजणार, लग्नाची...

नवं घर झालं, मुहूर्त ठरला, सुरज चव्हाणच्या घरी सनई चौघडे वाजणार, लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) त्याच्या गुलिगत स्टाईलमुळे घराघरात पोहोचला. बिग बॉस जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाणला घर बांधून देण्याची घोषणा केली होती.

 

नुकताच सूरजने त्याच्या नव्या कोऱ्या आलिशान घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली. दुमजली प्रशस्त घर, मोठमोठ्या खिडक्या, फ्लोरिंग, किचन, सगळंच अगदी अद्ययावत तंत्रज्ञान असणार अलिशान दिसणार सुरज घर खूपच छान दिसत आहे. दुसरीकडे बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्याचं काही दिवसांवर लग्नही आलं आहे. लग्नाचा मुहूर्त ठरलाय. लगीनघाई सुरू आहे. नव्या घरात सुरज आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लवकरच संसार थाटणार आहे. दरम्यान, सुरजच्या लग्नाची पत्रिकाही समोर आलीय. (Wedding Invite Viral)

 

काही दिवसांपूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनेही सुरज आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात कधी व कुठे करणार ?याचा खुलासा केला होता. सुरज चव्हाण चा लग्न सोहळा 29 नोव्हेंबरला पार पडणार आहे. पुण्याजवळील जेजुरी सासवड येथे हा विवाह सोहळा होणार आहे. लग्नसमारंभा पूर्वीचे विधी 28 नोव्हेंबर पासून सुरू होतील. या समारंभात हळद मेहंदी आणि संगीत असे कार्यक्रमाही असणार आहेत. आता लग्नाची पत्रिका ही समोर आली आहे. सुरज चव्हाण च्या लग्नाची पत्रिका सध्या व्हायरल होत असून त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी सोशल मीडियावरही शेअर केली आहे. त्याच्या लग्नाच्या पत्रिकेवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

 

सुरज चव्हाणची होणारी बायको कोण?

 

बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाण ने काही दिवसांपूर्वी आपल्या होणाऱ्या बायकोसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्याने तिचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे अनेक दिवस त्याच्या चाहत्यांना सुरजची बायको कोण ? याबाबत उत्सुकता आणली होती. ही उत्सुकता आता संपली आहे. सुरजच्या पत्रिकेवर त्याच्या बायकोचा फोटो आहे. सुरजच्या बायकोचं नाव संजना असून सुरज आणि संजना चा अरेंज मॅरेज नसून लव मॅरेज असल्याचं काही दिवसांपूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरं सांगितलं होतं. सुरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. संजना ही सुरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. असंही तिने सांगितलं.

 

पत्रिकेवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

 

सुरजच्या लग्नपत्रिकेवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनंदनाचा वर्षाव सुरु असून एकाने लिहिलं, आधी कॅरियर मग लग्न हे वाक्य तु पूर्ण केलं सुरज भाऊ अभिनंदन…अभिनंदन सुरज भाऊ…अभिनंदन सुरेश दादा नवीन वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा अशा कमेंट्स येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -