Monday, November 24, 2025
Homeब्रेकिंगविद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा झाली आहे. आता CET (राज्य सामाईक प्रवेश परीक्षा) वर्षातून तीन वेळा घेतली जाणार आहे, ज्यमुळे प्रवेशासाठी अअधिक संधी उपलब्ध होतील.

 

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, पुढी काही वर्षांपासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा पुढील वेळापत्रकानुसार होणार आहे. यात पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये, तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.

 

यात २०२६ चे प्रवेश होतील. आणि डिसेंबर २०२६ मध्ये घेण्यात येणारी तिसरी सीईटी परीक्षा आणि एप्रिल २०२७ मध्ये घेणार येणारी सीईटी परीक्षा ही २०२७ मधील प्रवेश राबविले जाणार आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी फायदा कसा होणार

 

– वर्षभरात तीन परीक्षा घेतल्या जात असल्याने, जे विद्यार्थी एकाच वेळी चांगले गुण आत्मसात करू शकत नाहीत त्यांना अधिक संधी मिळतील.

 

– जर एखादा विद्यार्थी दोन किंवा अधिक वेळा परीक्षेला बसला तर जास्त गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा प्रवेशासाठी विचार केला जाईल.

 

– यामुळे ताण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना चांगली तयारी करण्याची आणि परीक्षा देण्याची संधी मिळेल.

 

कारण आणि मागणी

 

ज्याप्रमाणे जेईई-मेन परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते, त्याचप्रमाणे वर्षातून दोन्ही वेळा सीईटी परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. सरकारच्या निर्णयामुळेच ही मागणी पूर्ण झाली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक बदल आहे कारण त्यामुळे प्रवेश परीक्षा देणे अधिक लवचिक आणि तणावमुक्त होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -