अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा नदीवेस नाका इचलकरंजी यांच्यावतीने श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ याग आणि श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २८ नोव्हेंबर ते शुक्रवार ता. ५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या सप्ताह कालावधीत विविध अध्यात्मिक धार्मिक सेवा करण्यात येणार आहेत.
आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन
इचलकरंजी : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी युवकास अटक
इस्रोत अप्रेंटिसची संधी, १० वी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत करु शकतात अर्ज
सप्ताह कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण बरोबरच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग, श्री स्वामी याग, श्री गीताई याग, श्री चंडीयाग, श्री रुद्र याण, श्री मल्हारी याग, असे विविध यान संपन्न होणार आहेत, गुरुवार ता.४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तर ५ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शर सत्यदत्त पूजन होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे.
जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला
27 वरून 12 आणि आता फक्त 4 सरकारी बँक सुरु राहणार; कोणत्या बँका बंद होणार?
सप्ताह काळात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती, संपूर्ण दिवसभर महिलांची तर रात्रभर पुरुष सेवेकऱ्यांची प्रहरे (अखंड नामस्मरण सेवा) होणार आहे. या आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.



