Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रफुटबॉल खेळताना १३ वर्षीय मुलाला आला हृदयविकाराचा झटका, मैदानातच झाला मृत्यू

फुटबॉल खेळताना १३ वर्षीय मुलाला आला हृदयविकाराचा झटका, मैदानातच झाला मृत्यू

गुजरातमधील मेहसाणा येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मेहसाणा-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या तपोवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये फुटबॉल खेताळताना एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

 

हा विद्यार्थी वांकानेरचा रहिवासी होता आणि तीन वर्षांपासून शाळेत शिकत होता. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांवर दुःखचं डोंगर कोसळलं आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही दुःखद घटना घडली. वांकानेरमधील धरम सोसायटीमध्ये राहणारा १३ वर्षीय जैमील गौतमभाई कंसागरा शाळेच्या मैदानावर इतर मुलांसोबत फुटबॉल खेळत होता. खेळ सुरू असताना जैमील अचानक कोसळला आणि बेशुद्ध पडला. शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला ताबडतोब उपचारासाठी शंकूज रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

घटनेची माहिती मिळताच लांघणज पोलिस ठाण्याचे एएसआय किरीट चौधरी घटनास्थळी पोहोचले. जैमीलच्या वडिलांच्या अर्जाच्या आधारे पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -