राज्यातील नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षाचे नेते पायाला भिंगरी लावून प्रचारासाठी धावपळ करत आहेत. तर दुसरीकडे काही नेते हे आपल्याच पक्षावर नाराज असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह अनेक ब्लॉक अध्यक्षांनी एकत्र राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सचिन पोटे यांचा राजीनामा
कल्याण मधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह अनेक ब्लॉक अध्यक्षांनी एकत्र राजीनामा दिला आहे. या सर्व नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस कमकुवत झाली आहे.
ब्लॉक अध्यक्षांनीही दिले राजीनामे
समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल 11 वर्षापासून सचिन पोटे हे कल्याण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी साभाळत आहेत. मात्र आता अचानक त्यांना पक्षाकडून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचे दिला असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाध्यक्षांनी राजीनामा देतात इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि ब्लॉक अध्यक्षांनीही आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. आता चंद्रशेखर सपकाळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सचिन पोटे काय निर्णय घेणार ?
सचिन पोटे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांची पुढील राजकीय दिशा काय असणार याची चर्चा रंगली आहे. ते पक्ष सोडणार की पक्षातच राहून काम करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याआधी बऱ्याच नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजप किंवा सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता, त्यामुळे आता सचिन पोटे काय निर्यण घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचाही समावेश असणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सचिन पोटे आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस कमकुवत झाली आहे.


