Wednesday, January 14, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी: रेकॉर्डवरील गुन्हेगाराची आत्महत्या

इचलकरंजी: रेकॉर्डवरील गुन्हेगाराची आत्महत्या

पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजू उर्फ चिन्या संजय सुर्यवंशी (वय २३ रा. इंदिरा कॉलनी जवाहरनगर) याने शुक्रवाती सायंकाळच्या सुमाराम स्टेशन रोडवरील मोकळया कंपाऊंडमध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरु होते.

 

याचाचत पटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, चिन्या सुर्ववशी हा सराईत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नुकतीच त्याच्यावरील हदपारीच्या कारवाईची मुदत संपली होती. शुक्रवारी सायंकाळी डेकन निलसमोर असलेल्या पारले कंपाऊंड या मोकळ्या जागेत चिन्याने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून चिन्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविला होता. याठिकाणी चिन्या सुर्यवंशी याच्या समर्थकांनी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -