Saturday, December 13, 2025
Homeमहाराष्ट्रक्रिती सेनॉन-धनुषचा पहिल्या आठवड्यातच बंपर धमाका! 'तेरे इश्क में' १०० कोटी पार

क्रिती सेनॉन-धनुषचा पहिल्या आठवड्यातच बंपर धमाका! ‘तेरे इश्क में’ १०० कोटी पार

बॉलीवूडची चर्चि त जोडी क्रिती सेनॉन आणि धनुष यांचा ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच १०० कोटींचा टप्पा पार करत ११८.७६ कोटींची बंपर कमाई केली आहे. पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग घेतलेल्या या चित्रपटाने विकेंडमध्ये जोरदार गती पकडली. ट्रेड ॲनालिस्ट यांच्या माहितीनुसार, चित्रपटाने सात दिवसांत देशांत ८२ कोटींच्या दरम्यान तर परदेशातील कमाई अशी एकूण ११८ कोटी कमावले आहेत. या आकड्यांमुळे तेरे इश्क में हा वर्षातील सर्वाधिक दमदार सुरुवात करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार, भारतात सातव्या दिवशी ५.७ कोटींची कमाई केली. विकेंडचा आकडा ८३.५५ कोटी झाला. तर वर्ल्डवाईड कमाई १०८ कोटी रुपये झाली. पहिल्या दिवशी १६ कोटी, दुसऱ्या दिवशी १७ कोटी, तिसऱ्या दिवशी १९ कोटी रुपये. चौथ्या दिवशी ८.७५ कोटी, पाचव्या दिवशी १०.२५ कोटी, सहाव्या दिवशी ६.८५ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केलीय.

 

क्रिती सेनॉनने अलीकडच्या काळात ‘मिमी’, ‘गणपथ’, ‘द क्रू’ यांसारख्या विविध भूमिकांमुळे स्वतःला एक बहुआयामी उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. तर धनुषला वेगळी ओळख निर्माण करायची गरज नाही. तो नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यास यशस्वी ठरला आहे. या दोघांच्या फ्रेश केमिस्ट्रीमुळे तेरे इश्क में तरुण वर्गात खासकरून कपल्सच्या पसंतीस उतरला आहे.

 

यावर्षी धनुषचे बॉक्स ऑफिसवर ३ चित्रपट रिलीज झाले आहेत. त्यापैकी तेरे इश्क में हा एक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याचा मागील चित्रपट, कुबेराने १२० कोटी बजेटमध्ये ११५ कोटी कमावले होते. नंतरचा चित्रपट इडली कडाईने ७१.३२ कोटींचा गल्ला जमवला होता.

 

रांझणा’ही चर्चेत

 

‘तेरे इश्क में’ हा धनुषचा दुसरा हिंदी चित्रपट आहे. त्याआधी तो सोनम कपूर सोबत ‘रांझणा’ चित्रपटात काम केले आहे. त्यावेळी त्यांची केमिस्ट्री फॅन्सना आवडल होती. आता तेरे इश्क मे च्या निमित्ताने धनुषच्या रांझणाचीही चर्चा होऊ लागली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -