Wednesday, February 25, 2026
Homeअध्यात्म13 जानेवारी मंगळवार : भोगीच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून टाका ही वस्तू...

13 जानेवारी मंगळवार : भोगीच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून टाका ही वस्तू : सर्व दोष, विघ्न दूर होतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

13 जानेवारी भोगीच्या दिवशी मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू .जे काही दोष असतील, विघ्न असतील ते सर्व निघून जातील. मुलांची प्रगती होईल, शिक्षणात मन लागेल, मुलाची प्रगती होईल नवीन वर्ष सुरू झाले की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. आणि त्याच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी आईने आपल्या मुलावरून ही वस्तू ओवाळून टाकायचे आहे.

भोगीच्या सणाला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी भोगीची मिक्स भाजी केली जाते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून बरेच उपाय देखील केले जातात. या दिवशी आपल्या मुलाबाळांना ओवाळायचे आहे. मग ती मुलगी असं किंवा मुलगा असो. लहान किंवा मोठा असो त्यांचे नजर काढून त्यांना ओवाळायचे आहे. आपण जी वस्तू ओवाळणार आहोत ती आपल्या मुलावरून भोगीच्या दिवशी वाळवून टाकायची आहे. मात्र सूर्य उगवलेला आहे तोपर्यंतच हा उपाय करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी हा उपाय करायचा नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे तीळ लागणार आहेत. आणि मुलाला पूर्वेला तोंड करून एका ठिकाणी बसवायचे आहे. त्यानंतर आरतीचे ताट तयार करून त्या ताटामध्ये आपल्याला काळे तीळ ठेवायचे आहे. पहिल्यांदा ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आरतीच्या ताटातील काळे तीळ उजव्या हातात घेऊन आपल्या मुलावरून सात वेळा उतरवायचे आहे. काळे तीळ मुलांवरून उतरून घेत असताना घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरून घ्यायचे आहेत काळे तीळ उतरून झाल्यानंतर घराबाहेर जाऊन सात पावले पुढे जायचे आहे आणि तेथील येथे टाकायचे आहे.

हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहे जर मुलं शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर असतील तर त्यांच्या फोटोवरून आपल्याला वरील सांगितलेला उपाय करायचा आहे. आणि त्यांचे नाव घ्यायचे आहे. हा उपाय केल्यामुळे मुलांवर कोणतीही वाईट बाधा नकारात्मक शक्ती प्रभाव पडणार नाही. त्यांची प्रगती होईल त्यांचे अभ्यासात मन लागेल. परीक्षेमध्ये चांगले यश येईल त्यासोबतच ते आई-वडिलांच्या प्रत्येक गोष्टी ऐकतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -