Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रतरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्

तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्

उत्तर प्रदेशमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. (situation) उत्तर प्रदेशच्या एटामध्ये रविवारी ऑनर किलिंगची घटना घडली. या ठिकाणी २० वर्षीय तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत घरकामध्येच नको त्या अवस्थेत कुटुंबीयांनी पकडलं. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

 

रविवारी रात्री उशिरा एटातील जैथरा येथील एका गावात ही (situation)धक्कादायक घटना घडली. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. तरुणीच्या कुटुंबीयांना हे माहिती पडताच त्यांनी घरी धाव घेतली. यावेळी दोघांनाही त्यांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यावेळी मुलीचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी चोर चोर असं जोरजोरात ओरडण्यास सुरूवात केली.

 

तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणी दोघांनाही विटा, दगड आणि काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तरुण आणि तरुणीला इतकी मारहाण करण्यात आली की दोघेही रक्तबंबाळ झाले. चोर असल्याचा संशय आल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी पोहचल्यानंतर तरुण दीपक असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत उशिर झाला होता. (situation) तरुण-तरुणीला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली होती की यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -