नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
रथसप्तमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेव उत्तरायण मार्गावर येतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप आणि मंत्रोच्चार यांना विशेष फल प्राप्त होते असे मानले जाते.
रथसप्तमीला हा उपाय आपण केल्यामुळे जे मागेल ते मिळणार आहे याचबरोबर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, personal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणी असतील तर अशा सर्वच अडचणी वाढण्यास सुरुवात होते.
रथसप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास स्नानाच्या वेळी डोक्यावर सात अर्काची पाने ठेवावीत. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना मन एकाग्र ठेवणे फार महत्त्वाचे असते. याच वेळी खालील मंत्र श्रद्धेने जपावा.
मंत्र:
“ॐ घृणि सूर्याय नमः”
हा मंत्र सूर्यदेवाचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप किमान 108 वेळा करावा. जप करताना मनात कोणताही नकारात्मक विचार येऊ देऊ नये. आपली इच्छा स्पष्ट शब्दांत किंवा मनात ठामपणे व्यक्त करावी.
अशी श्रद्धा आहे की रथसप्तमीच्या दिवशी हा मंत्र बोलल्यास आरोग्य, धन, नोकरी, व्यवसायातील प्रगती आणि मानसिक शांतता मिळते. मात्र, मंत्र जपताना पूर्ण विश्वास आणि संयम आवश्यक आहे. केवळ मागणे नाही, तर चांगले कर्म करण्याची तयारीही असावी.
रथसप्तमी हा दिवस आत्मशुद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचा संदेश देतो. श्रद्धेने आणि नियमाने केलेला मंत्रजप नक्कीच जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो.





