Sunday, June 7, 2026
Homeइचलकरंजीतारदाळमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला

तारदाळमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला

पूर्वी झालेल्या याद मनात धरून भांडणाच्या रागातून एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना तारदाळ गौरीशंकर नगर येथे समोर आली आहे.

गौरी शंकर नगर तारदाळ येथील ओमकार ननवरे या युवकास गणपती मंदिर समोर चाकूने छातीवर पोटावर सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयीत बल्या उर्फ तोहीद रजाक मुल्ला राहणार योद्यात्रम शहापूर व एक अल्पवयीन बालक अशा दोघावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी ओमकार ननवरे व यश गवळी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याच पूर्ववैमनस्यातून शुक्रवारी दिनांक ५ रोजी पुन्हा बाद होऊन बल्या उर्फ तोहीद मुल्ला यनि धारधार शस्त्राने वार करून ओमकार यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात ओमकार नारायण सोनटक्के राहणार गौरीशंकर नगर तारदाळ यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -