Home कोल्हापूर काेल्हापूर जिल्ह्यातील १,३४२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; पात्र शेतकऱ्यांनी त्वरित करा हे काम, नेमकं किती कर्ज हाेणार माफ?

काेल्हापूर जिल्ह्यातील १,३४२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; पात्र शेतकऱ्यांनी त्वरित करा हे काम, नेमकं किती कर्ज हाेणार माफ?

0

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आज ३ लाख ५१ हजार १९२ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार ३४२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

 

या यादीतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

 

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजी या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जे दोन लाख रुपयांपर्यंत माफ करण्यात येणार आहेत.

 

 

या योजनेसाठी बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यानंतर संगणकीय प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची यादी तयार केली. यापूर्वी २४ जुलैला पहिल्या यादीत १६.९६ लाख, तर ११ सप्टेंबरला दुसऱ्या यादीत ४.२० लाख शेतकऱ्यांचा समावेश केला होता. आता तिसऱ्या यादीतील ३.५१ लाख शेतकऱ्यांसह आतापर्यंत एकूण २४.६७ लाख शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध झाली आहे.

 

तिसऱ्या यादीत पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरमधील १ हजार ३४२, पुण्यातील १ हजार ७१८, सांगलीतील १ हजार १९२, साताऱ्यातील १ हजार २०५ आणि सोलापूरमधील ६ हजार ४७१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या विभागातील जिल्ह्यांतील एकूण शेतकऱ्यांची संख्या ११ हजार ९२८ आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जबाकी तपासून जवळच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाने केले आहे.