Home कोल्हापूर राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, ‘तुमच्या काकांनी ठेवलंय का?’

राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, ‘तुमच्या काकांनी ठेवलंय का?’

0

राज्यात, देशात सध्या आंदोलनाचीच चर्चा आहे, त्यातच आता यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा ऊसाला चांगला भाव देण्याची मागणी केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 25 व्या ऊस (Sugarcane) परिषदेत माजी खासदारराजू शेट्टींनी (Raju shetti), ऊसाला 5 हजार 500 रुपये टन भाव देण्याची मागणी केली. आता, राजू शेट्टींच्या या मागणीवर नाव न घेता माजी सहकारमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip walase patil) यांनी प्रत्युत्त दिलंय. एखादा कारखाना चालवायला घ्या व द्या पहिली उचल पाच हजार, असे म्हणत वळसे पाटलांनी राजू शेट्टींवर पटलवार केलाय

 

राजू शेट्टींनी ऊस परिषदेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या केल्या आहेत. त्यातील प्रमुख मागणी म्हणजे यंदा ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा असे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे, मागणी मान्य न केल्यास ऊस तोडू देणार नाही, असा इशारा देखील शेट्टींनी दिला आहे. दरम्यान, या ऊस परिषदेला मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. आता, राजू शेट्टींच्या मागणीवरुन दिलीप वळसे पाटलांनी जोरदार टोला लगावला. तुमच्या काकांनी ठेवलंय का? अशा शब्दात त्यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला.

 

साखर कारखानदारी अडचणीत असताना काही लोक शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी संघटना ऊसाला पहिली उचल पाच हजार रुपये द्या अशी मागणी करत आहे. “तुमच्या काकांनी ठेवलंय का?” या एखादा कारखाना चालवायला घ्या व द्या पहिली उचल पाच हजार. कुठून देणार पाच हजार कर्ज काढून, बंद पडायचाय का कारखाना. अशा शब्दात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शेतकरी संघटनेला सुनावले आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ समारंभात वळसे पाटील बोलत होते.

 

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?

यंदा उसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी राजू शेट्टींनी केलीय. ऊसाला प्रति टन पहिला महिना 4500 , त्यानंतर 500 रुपये आणि केंद्र सरकारचे अनुदान 500 रुपये असे मिळून 5 हजार 500 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत उसाची तोड घ्यायची नाही, इथेनॉलला लिटरला 70 रुपयांचा दर तर कारखान्यातून बाहेर पडणार्‍या साखरेला किमान 50 रुपये भाव द्यावा असी मागणी राजू शेट्टी यांनी केली. 12 ऑक्टोबरला केंद्र सरकार बरोबर होणारी चर्चा फिसकटली तर 13 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील राष्ट्रीय महामार्ग बंद करणार असल्याचा इशाराही शेट्टींनी दिला आहे. महाराष्ट्रातही महामार्ग, रेल्वे बंद करणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे. कोगनोळी टोल नाक्यावर बसणार आणि कर्नाटक-महाराष्ट्र राष्ट्रीय मार्ग बंद करणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.