Homeमहाराष्ट्रइथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या आजचा भाव?

इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या आजचा भाव?

देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून चर्चा सुरू असतानाच 22 ऑगस्ट 2026 रोजी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या किमतींमध्ये मोठा बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोल 102.12 रुपये, तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात शेवटची मोठी वाढ 25 मे रोजी झाली होती. त्यानंतर प्रमुख शहरांमध्ये दर तुलनेने स्थिर आहेत. दरम्यान, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे साखरेच्या किमती वाढत असल्याचा दावा सरकारने फेटाळला आहे.

सरकारच्या माहितीनुसार, इथेनॉलसाठी साखरेचा वापर 2022-23 मधील सुमारे 12 टक्क्यांवरून 2025-26 मध्ये जवळपास 9 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच सुमारे 75 टक्के इथेनॉल धान्यांपासून, विशेषतः मक्यापासून तयार केले जात आहे.साखरेच्या दरवाढीमागे कमी उत्पादन, वाढलेली मागणी, हवामानाचा परिणाम, जागतिक बाजारातील पुरवठा आणि साठेबाजी यांसारखी विविध कारणे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल दरात कोणताही मोठा दिलासा किंवा झटका मिळालेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -