Homeकोल्हापूरसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'गोकुळ'चं चित्र होणार स्पष्ट; बिनविरोधची शक्यता मावळली, अंतिम मतदार...

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘गोकुळ’चं चित्र होणार स्पष्ट; बिनविरोधची शक्यता मावळली, अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

जिल्ह्यातील सहकारात सप्टेंबरमध्ये राजकीय वातावरण तापणार आहे. गोकुळच्या अंतिम मतदार यादीनंतर पक्षीय राजकरणाला वेगळेच वळण लागणार आहे. सत्तेतील पण सध्या एकटे असलेले आमदार सतेज पाटील यांनी २५ जागा लढविणार असल्याचे सांगून राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट केले.

सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठरावाची प्रक्रिया सुरू आहे. याचवेळी अनेक अडथळे पार करून गोकुळची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. आजपर्यंत मतदार निश्‍चित नसल्यामुळे संचालक आणि नेत्यांनीही शांततेत घेतले होते. आता मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून एकत्रित प्रचार सुरू केला आहे. मात्र, त्याला अद्याप गती नाही. केवळ संपर्क दौरे सुरू आहेत.

 

निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्‍वास पाटील यापूर्वी आमदार पाटील यांच्याकडे होते. आता ते त्यांच्या विरोधी गटात आहेत. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरेही पाटील यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण वेगळे असणार आहे. शेतकरी पॅनेल आणि नेत्यांचे पॅनेल असे दोन भाग दिसणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीची रंगत दिसायला सुरुवात होणार आहे.

 

भाजप वगळता अन्य पक्षांचे संपर्क दौरे सुरू

 

दूध उत्पादक कोणाच्या बाजूने उभे राहणार, हे प्रचाराच्या मुहूर्तानंतरच स्पष्ट होणार आहे. टोकण आणि इतर बाबींचा विचार करता महायुती म्हणून सर्व नेते एकत्रित असणार आहेत. भाजप वगळता महायुतीतील अन्य पक्षांनी संपर्क दौरे सुरू केले आहेत.

 

आमदार सतेज पाटील गटाकडून अंतर्गत प्रचार सुरू

 

आमदार पाटील यांच्या गटाकडून अंतर्गत प्रचार सुरू आहे. पॅनेलमध्ये कोण पंचवीस उमेदवार असणार हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे त्यांनी अंतर्गत प्रचार सुरू केल्याचे सांगण्यात येते.सांगण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -