आजकाल AI आपल्या सगळ्या कामात मदत करतंय, पण ChatGPT ला काही प्रश्न विचारणं तुम्हाला महागात पडू शकतं. यामुळे पोलिस थेट तुमच्या दारात येऊ शकतात. काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया.आजच्या काळात आपण छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या कामांपर्यंत AI ची मदत घेतो.
ChatGPT आणि Gemini सारखे AI टूल्स सध्या खूप लोकप्रिय आहेत. आपण २४ तास कोणताही प्रश्न ChatGPT ला विचारतो. अगदी क्षणात उत्तर मिळत असल्यामुळे, याचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका छोट्या प्रश्नापासून ते मोठ्या समस्येपर्यंत, प्रत्येक गोष्टीवर उपाय विचारण्याइतके भारतीय याला सरावले आहेत.
अमेरिकेत पैसे आकारणारी हीच कंपनी भारतात मोफत सेवा का देते, यामागे भारतीयांचा डेटा गोळा करण्याचा उद्देश असल्याचीही चर्चा आहे. मोफत मिळालं की कोणत्याही गोष्टीचा अतिवापर करण्याची भारतीयांची मानसिकता त्यांना चांगलीच माहिती आहे.
पण तुम्हाला माहितीये का? हेच ChatGPT तुम्हाला तुरुंगाची हवा खायला लावू शकतं. पोलिसांनी याबाबत एक इशारा दिला आहे.
तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं ChatGPT कडे शोधता हे ठीक आहे. काही जण तर मित्र नसताना ChatGPT लाच आपला मित्र मानून गप्पा मारतात. तर काही जण याला आपला प्रियकर/प्रेयसी समजून रोज चॅटिंग करतात. पण तुम्ही उत्सुकतेपोटी, मुद्दाम किंवा अगदी गंमतीत जरी ChatGPT ला गुन्हेगारीशी संबंधित काही विचारलं, तर तुमची काही खैर नाही.
तुम्ही कोणताही संशयास्पद प्रश्न विचारल्यास, तो तुम्ही गंमतीत विचारलाय की मुद्दाम, हे ChatGPT बघत नाही. तुमचे प्रश्न थेट क्राईम ब्रांचकडे पाठवले जातात. तुम्ही वारंवार असे प्रश्न विचारल्यास, पोलिस थेट तुमच्या घराचा दरवाजा ठोठावतील.
ChatGPT सारख्या AI प्लॅटफॉर्मवर तुम्ही जी माहिती टाकता, ती त्यांच्या मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे, तुमची वैयक्तिक आर्थिक माहिती, पासवर्ड किंवा कंपन्यांचा गोपनीय डेटा AI चॅटमध्ये शेअर करू नका. AI ने दिलेली सर्व उत्तरं १००% अचूक नसतात. काहीवेळा ते चुकीची किंवा काल्पनिक माहितीही अगदी खरी असल्यासारखी सांगतात. त्यामुळे, वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी फक्त AI वर पूर्णपणे अवलंबून राहू नका.

