Homeमहाराष्ट्रआता मोबाईलफोन देखिल महागले, या मोबाईफोनच्या किंमतींमध्ये होणार वाढ ! काय आहे...

आता मोबाईलफोन देखिल महागले, या मोबाईफोनच्या किंमतींमध्ये होणार वाढ ! काय आहे मुख्य कारण.

सध्या मर्केट मध्ये आय फोन चा ट्रेन्ड आहे, यातचं सामान्य लोकच्या खिशाला परवडेल आणि वापरण्यात येईल असे नवीन मोबाईल मार्केट मध्ये आल्याचे पाहण्यास मिळत आहे, भारतात सध्या मोबाईल फोनच्या किंमतींमध्ये १५ ते ४० टक्के वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

 

यात रेयलमी , वनप्लस , पोको आणि लावा अशा मोबाईल फोनची सर्वात जास्त मागणी आहे.

 

सामान्य माणसांना सुद्धा रेयलमी आणि लावा वनप्लस असो मोबाईल फोन खिशाला परवडण्यासारखे आहेत, लोक अशा मोबाईल फोनला पसंती देत असतात, पण हेच मोबाईल फोन आता महाग होणार आहेत. तुम्ही सुद्धा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर थांबा काही मोबाईल फोन्सच्या किंमतीत वाढ होणार आहे. मोबाईल्सच्या पार्ट्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि पुरवठा साखळीत झालेल्या अडचणींमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. या मुळे स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. तर मेमरी चिपचा तुटवडा आणि वाढलेला उत्पादन खर्च हे यामागील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

 

किंमती वाढण्याची मुख्य कारणे

 

भारतात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ‘अजून काही दिवस थांबून घेऊ’ असा विचार करणाऱ्यांना मोबाईल कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. Realme, OnePlus, Poco आणि Lava यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सनी आपल्या प्रमुख मॉडेल्सच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत. या दरवाढीमागे जागतिक स्तरावर मेमरी चिप्सचा तुटवडा हे मुख्य कारण आहे. DRAM आणि NAND सारख्या महत्त्वाच्या स्टोरेज चिप्सच्या किमती वाढल्यामुळे स्मार्टफोनच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः मिड-रेंजमधील फोन्सच्या किमती हजारो रुपयांनी वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.

 

iPhone 18 Pro घेण्याची तयारी? Pre-Booking आजपासून – Navarashtr

 

प्रमुख ब्रँड्सची दरवाढ

 

सध्या Realme 16 Series ची खूप चर्चा सुरू आहे. Realme 16 Pro+ 5G मॉडेलच्या काही व्हेरिएंट्सची किंमत तब्बल 7,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय OnePlus 15R मॉडेलची किंमतही वाढवण्यात आली आहे. Poco X8 Pro Max आणि Lava Agni 4 हे फोनसुद्धा आता नव्या किमतीत विकले जात आहेत.

 

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह …

 

मेमरी चिपचा तुटवडा

 

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ग्राहकांना आता सध्याच्या ऑफर्स आणि जुन्या किंमतीचे मोबाईल आणि उपलब्ध असलेल्या स्टॉककडे लक्ष केद्रींत करत आहे. स्मार्टफोन विकत घ्यावा की आणखी वाट पाहावी ? या गोंधळात ग्राहक अडकले आहेत, ज्यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -