Homeमहाराष्ट्रहवेत 4 गिरक्या, 7 मजली इमारती इतक्या उंच डबल डेक्कर ब्रीजवरुन कोसळली...

हवेत 4 गिरक्या, 7 मजली इमारती इतक्या उंच डबल डेक्कर ब्रीजवरुन कोसळली BMW; मुंबईतल्या अपघाताचं थरारक CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा

मुंबईमधील कोस्टल रोडवर आज पहाटे अत्यंत धक्कादायक अपघात झाला असून या थरारक अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी झालेल्या या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

 

अपघातग्रस्त गाडी काही फुटांपर्यंत हवेत उडत गेली आणि जवळपास 75 फूट म्हणजेच सात मजली इमारती इतक्या उंचीवरुन खाली पडली. गाडीने हवेतही अनेक गिरक्या खाल्ल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

 

नक्की झालं काय?

 

बीएमडब्ल्यू कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कोस्टल रोड कंट्रोल रूमच्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 5.20 वाजता, लोटस जेट्टीजवळ लाला कॉलेजसमोर हा अपघात झाला. बीएमडब्यू कार मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात होती. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारने कोस्टल रोडवरील ब्रीजची संरक्षक भिंत तोडली आणि ती जवळपास 75 फूट खाली पडल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मीना जगताप यांनी दिली आहे.

 

हवेतच चार गिरक्या अन्…

 

कॅमेरात कैद झालेल्या दृष्यांनुसार, कारने एका वळणारील कठडा तोडला आणि ती खाली कोसळली. साधारण 75 फुटांवरुन खाली पडताने कारने हवेतच चार गिरक्या खाल्ल्या आणि कार खाली बांधकामाधीन पार्किंग क्षेत्रात आपटली आणि पूर्णपणे चेंदामेंदा झाली. कार एवढ्या वेगात आणि उंचीवरुन आपटली की ती जमीनवर पडल्यानंतर पुन्हा उडाली आणि खाली पडली. अपघातानंतर काळ्या रंगाची बीएमडब्लू कार अक्षरशः भंगारात निघाल्यासारखी दिसत होती.

 

मृतांची ओळख पटली

 

अपघातातील चारही जखमींना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सकाळी 8.40 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय आणि 17 वर्षीय तरुणांसह तिघांना मृत घोषित करण्यात आले आहे. 20 वर्षीय तरुणावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. आदित्य ओसवाल असं 23 वर्षीय जखमी तरुणाचं नाव आहे. तर मृत्यू झालेल्यांमध्ये चालक सनाय गुज्जर (21 वर्ष) धैर्य सेठ (17 वर्ष) आणि आदित्य जकसानिया (19 वर्ष) यांचा समावेश आहे. सनाय चालवत असलेली ही बीएमडब्ल्यू कार गुज्जर कुटुंबाच्या मालकीची आहे.

 

हे चारही तरुण गुजरातच्या अहमदाबादचे आहेत. ते मुंबईत विलेपार्ले परिसरातील मॅनेजमेंट महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत होते. रात्री भटकंतीसाठी बाहेर पडलेले असतानाच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -