Homeइचलकरंजीदातार मळ्यात भटक्या कुत्र्याची दहशत; दोघांवर हल्ला

दातार मळ्यात भटक्या कुत्र्याची दहशत; दोघांवर हल्ला

दातार मजा परिसरात एका भटक्या कुष्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून, गेल्या काही दिवसांपासून महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये मितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे N लागून अचानक हलना करून चावा घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत

 

बुधवारी पिठाची चकी दळण्यासाठी जात असलेल्या एका महिला व एका पुरुषावर याच कुव्याने अचानक हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली.

 

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या बा हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

आहे.

 

महापालिकेने पकडले: मात्र २४ तासांत पुन्हा त्याच परिसरात सोडाले

 

या आक्र मक कुत्र्यांच्या त्रासाबाबत नागरिक नो महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली होती. त्यानंतर महापालिका कर्मचान्यांनी कुल्यांना पकडून परिसरातून नेले. मात्र, नागरिकांच्या आरोपानुसार, अवध्या २४ तासांत त्याच कुव्याना पुन्हा ज्या परिसरातून पकडण्यात आले होते, त्याच परिसरात सोडण्यात आले. त्यामुळे महापालिकेची

 

प्रशासनाचे अक्ष्यम दुर्लक्ष; नागरिकांत तीव्र संताप

 

कारवाई नेमकी कोणत्या उद्देशाने झाली, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

कुत्र्याला खाद्य देण्यावरूनही नागरिकांचा आक्षेप

 

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील एका विद्यमान नगरसेवकांच्या घरातील व्यक्तींकडून या कुत्र्यांना दूध व बिस्किटे दिली जातात. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर सदर कुजे अचानक हत्ता करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी केलेल्या या आरोपांची महापालिकेने

 

वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.

 

आणखी एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहणार का?

 

लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना या कुत्र्यांमुळे जीव मुठीत धरून रस्त्यावरून जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहत असेल तर महापालिका प्रशासन आणखी किती नागरिक जखमी झाल्यानंतर जागे होणार? असा संतम सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

 

तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी

 

या आक्रमक कुत्र्यांचा तातडीने कायदेशीर व सुरक्षित पद्धतीने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, जखमी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय उपचार व मदत मिळावी आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी महापालिकेने तातडीने ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी दातार मळा परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेने तातडीने कारवाई न केल्यास महिला व नागरिकांची बैठक घेऊन महानगरपालिकेवर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. एखाद्या नागरिकाचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन या गंभीर प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -