Homeमहाराष्ट्रपीएम किसानचे पैसे पती-पत्नी दोघांना मिळतात का? वाचा काय सांगतो खरा नियम

पीएम किसानचे पैसे पती-पत्नी दोघांना मिळतात का? वाचा काय सांगतो खरा नियम

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आणि शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भार कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. यामध्ये पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

 

ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी २००० रुपये थेट बँक खात्यात जमा केली जाते. पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पती आणि पत्नी दोघेही शेतकरी असतील, तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळतो का? याबद्दल सरकारचे नियम काय आहेत, जाणून घेऊयात.

 

पती-पत्नी दोघांनाही मिळणार का लाभ?

 

पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार, एकाच शेतकरी कुटुंबातला पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांना स्वतंत्र लाभार्थी मानसं जात नाही. त्यामुळे पती आणि पत्नी दोघंही शेती करत असले तरी एकाच कुटुंबाला दोन स्वतंत्र लाभ मिळत नाहीत. पात्र शेतकरी कुटुंबातल्या फक्त एकाच सदस्यालाच या योजनेता लाभ मिळू शकतो. त्यामुळे पती-पत्नी दोघांनीही स्वतंत्रपणे अर्ज करून प्रत्येकी ६००० रुपये मिळवण्याचा प्रयत्न केल्याने तो नियमांनुसार मान्य होणार नाही.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय केलं पाहिजे?

 

पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे.

 

ई-केवायसी पूर्ण करा – लाभार्थ्यांनी आधार आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

 

जमिनीची पडताळणी – योजनेच्या नियमानुसार जमीनविषयक नोंदींची पडताळणी करून घ्यावी.

 

बँक खाते तपासा – आधारशी जोडलेले बँक खाते आणि इतर आवश्यक माहिती योग्य असल्याची खात्री करा.

 

अडचण आल्यास कुठे संपर्क साधाल?

 

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल किंवा अर्जासंदर्भात काही अडचणी येत असतील तर शेतकरी अधिकृत हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 वर संपर्क साधू शकतात. तसेच 011-23381092 या क्रमांकावरही मदत मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -