Homeमहाराष्ट्रकोल्हापूर: चैनीसाठी स्वत:च्याच घरात चोरी; उच्चशिक्षित तरुणास अटक

कोल्हापूर: चैनीसाठी स्वत:च्याच घरात चोरी; उच्चशिक्षित तरुणास अटक

महागडा मोबाईल खरेदी करण्यासह चैनीसाठी स्वत:च्याच घरी चोरी केल्याप्रकरणी उच्चशिक्षित तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली. यश सुनील बंडगर (वय २१, रा. शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून ५० ग्रॅम सोन्याचे दागिने व साडेतीन लाखांची रोकड असा एकूण १० लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

 

सोमवारी पहाटे घडलेल्या या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चोवीस तासांत छडा लावला.

 

फिर्यादी सुनील बंडगर यांच्या शिंगणापूर येथील शाकंभरी कॉलनीतील घरातून सोमवारी ५ तोळे सोने आणि साडेतीन लाख रुपये चोरीस गेले. करवीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण याचा समांतर तपास करत होते. दरम्यान, ही चोरी यश बंडगरने केली असून, तो सोने विकण्यासाठी लक्षतीर्थ येथील एका मंदिरानजीक येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. यानुसार अंमलदार शुभम संकपाळ, युवराज पाटील, समीर कांबळे यांनी सापळा रचून यशला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये चोरीतील मुद्देमाल जप्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -