आयसीसी २०२७च्या वर्लडकपचे वेळापत्रक जाहीर करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केप टाउनमधील ‘झिट्झ म्युझियम ऑफ कंटेम्पररी आर्ट आफ्रिका’ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेचा सर्व तपशील स्पष्ट केला जाणार आहे. या तीन देशांमधील एकूण १२ मैदानांवर सामने खेळवले जातील. २०२७ च्या विश्वचषकाची सुरुवात ‘सुपर सिरीज’ने होईल, ज्यामध्ये सहभागी १४ संघांपैकी सर्वात कमी गुण असलेल्या तीन संघांचा समावेश असेल. त्यानंतर प्रत्येकी सहा संघांचे दोन गट असतील आणि त्यानंतर ‘सुपर ७ टप्पा, उपांत्य फेरी व अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पात्रता फेरी ‘अ’ संघांचा समावेश आहे. तर गट बमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पात्रता फेरी ‘ब’ संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या या थरारासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

