तुम्ही नवीन स्मार्टफोन, टीव्ही किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर आजपासून ‘बिग बँग दिवाळी सेल’ सुरू झाली आहे.
या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर बंपर डिस्काउंट मिळण्याची शक्यता असून, दिवाळीच्या खरेदीसाठी हा उत्तम सुवर्णकाळ ठरू शकतो.
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स पाहायला मिळत आहेत. बजेट स्मार्टफोनपासून ते अगदी प्रीमियम स्मार्टफोन्सपर्यंत विविध ब्रँड्सवर डिल्स उपलब्ध आहेत. तसेच, काही फोनवर बँक ऑफर्स आणि जुना फोन एक्स्चेंज करण्याचा फायदा देखील मिळू शकतो.
स्मार्टफोन व्यतिरिक्त टीव्ही, लॅपटॉप, हेडफोन आणि स्मार्टवॉच खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सेलमध्ये अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन टीव्ही किंवा लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर सेलदरम्यान मिळणाऱ्या किमती आणि ऑफर्सची तुलना करणे फायदेशीर ठरेल.
खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
किमतीची पडताळणी: सेल सुरू होण्यापूर्वी किंवा खरेदी करताना हव्या असलेल्या उत्पादनाची किंमत इतर वेबसाइटवरही नक्की तपासा, जेणेकरून सेलमध्ये मिळणारा डिस्काउंट खरोखरच फायदेशीर आहे का, हे स्पष्ट होईल.
बँक व एक्स्चेंज ऑफर्स: उत्पादनावर उपलब्ध असलेले बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर्स आणि प्रॉडक्टची रेटिंग आवर्जून चेक करा.
नियम व अटी: केवळ मोठा डिस्काउंट पाहून खरेदी करू नका, तर उत्पादन तुमच्या गरजेनुसार योग्य आहे का ते तपासा. तसेच, विविध ऑफर्सच्या अटी व शर्ती वाचूनच ऑर्डर फायनल करा.

