Homeमहाराष्ट्रराज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; १० सणांच्या अग्रिम रकमेत मोठी वाढ

राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; १० सणांच्या अग्रिम रकमेत मोठी वाढ

राज्य सरकारने अराजपत्रित कर्मचाऱ्यांना मोठी दिवाळी भेट दिलीय. ग्रेड वेतन ४ हजार ८०० पेक्षा कमी असलेल्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सण अग्रिम रकमेत भरघोस वाढ करण्यात आलीय. सरकारने १० सणांसाठी ही रक्कम आता २० हजार रुपये एवढी केलीय. वित्त विभागाने गुरूवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय. १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. याआधी अग्रिम सण रक्कम १२ हजार ५०० एवढी होती. त्यामध्ये आता ७ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

 

शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या १० सणांसह सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच सण अग्रिमचा निर्णय लागू असेन. सरसकट सर्व सणांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. या सणांमध्ये दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस आदी सणांचा समावेश आहे.

 

दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवस्तरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती), स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. आंबेडकर जयंती या सणांचा उल्लेख शासन निर्णयामध्ये आहे. सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केलेय.

 

हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासूनच निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२(जे) मध्ये योग्य ती सुधारणा यशावकाश करण्यात येईल, असेही सरकारकडून सांगण्यात आलंय.

 

सरकारच्या लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे बदल

 

लेक लाडकी योजनेअंतर्गत आजपर्यंत पहिला लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2,98,695 इतकी आहे. या योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आलीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -